सैराट’मधील फेम परश्या उर्फ आकाश ठोसर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ त्यांच्यासोबत तो शेअर करत असतो. त्यांचे विविध अंदाजातील आणि चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो तो यावर पोस्ट करत असतो. त्याच्या सगळ्याच फोटोंना त्यांच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो.
यातच आकाशने नवा लुक म्हणजेच मेकओव्हर इंट्राग्रामवर शेअर केला आहे. या नव्या लुकमध्ये चित्रपटामध्ये पदार्पणाच्या सुरुवातीचा आकाश आणि पोस्ट केलेल्या फोटोमधील आकाश पूर्णपणे वेगळा दिसत आहे.
View this post on Instagram
“Don’t look back, there is nothing in past, look in the future and win it.”???
आकाशने शेअर केलेल्या फोटोत तो डोक्यावर हॅट, गळ्यात मफलर अशा कूल लुकमध्ये दिसत आहे. आकाशचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.