आंदोलकांनी खलिस्तानवाद्यांचा झेंडा फडकावला का? काय आहे सत्य वाचा

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.  दरम्यान, शेतकऱ्यांचा एक समूह ट्रॅक्टरमध्ये चढून लाल किल्ल्यात घुसला असल्याने या आंदोलनाला आता अतिसंवेदनशील वळण लागले असल्याचे दिसत आहे.

यावेळी त्यांच्या हातात असलेल्या झेंड्यावरून सध्या लोकांच्या मनाता विविध शंका उपस्थित झाल्या आहेत.  सध्या सोशलवर  आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावलेला ध्वज हा खलिस्तानचा असल्याचा दावा काहींनी केला . सोशल मीडियावर ज्या गोष्टी पसरवरल्या जात आहेत, त्या चुकीच्या असून आंदोलकांनी खलिस्तानवाद्यांचा झेंडा फडकवलेला नाही. तर शिख धर्मातील खालसा पंथाचा तो झेंडा होता.

निशान साहिब म्हणजे काय?

  • हे खालसा पंथाचे पारंपरिक चिन्ह आहे.  या  पिवळा ध्वजाला  शीख धर्मातील पवित्र  ध्वज म्हणून मानले जाते.या ध्वजाच्या मधोमध खंडाचं (तलवार) चिन्ह देखील असतं. या चिन्हात दोन तलवार आणि चक्र असतं.
  •  गुरुद्वाराच्या टोकावर किंवा उंचीवर हा ध्वज फडकत असल्याने तू दूरुनच पाहता येऊ शकतो. बैसाखीच्या शुभ मुहूर्तावर हा खाली उतरवला जातो. दूध आणि पाण्याने तो पवित्र केला जातो. शीख समाजात निशान साहिबचं फारच महत्त्व असल्याने तो सन्मानाने ठेवला जातो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.