Parag Tyagi : अभिनेत्री शेफाली जरीवालाचा वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या मृत्यूविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. जूनमध्ये तिच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होईल. मात्र, अजूनही तिच्या मृत्यूविषयी विविध चर्चा सुरूच आहे. अभिनेत्री सौंदर्यवर्धक इंजेक्शन्स घेत असल्याचा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला होता. आता तिचा पती पराग त्यागीने याबाबत मौन सोडलं असून इंजेक्शनच्या चर्चांनावर एका मुलाखतीत भाष्य केले आहे. शेफाली जरीवाला हिला काटा लगा गर्ल असेही म्हटले जाते. तिच्या मृत्यूनंतर विविध चर्चांना उधाण आले होते. तिच्या मृत्यूला आता बऱ्याच महिन्यांचा काळ लोटला आहे. शेफाली उपाशीपोटी सौंदर्यवर्धक इंजेक्शन्स घेत होती, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा दावा केला जात आहे. ‘फिल्मी ज्ञान’ला दिलेल्या मुलाखतीत तिचा पती पराग त्यानीने या अफवा फेटाळून लावल्या आहेत. “आम्ही सर्व काही खातो. आम्हाला उपाशी राहण्याची काय गरज आहे?” असा संपप्त सवाल त्याने उपस्थित केला. तसेच शेफालीबद्दल बोलताना तो म्हणाला, “ती तिच्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर सर्वात तंदुरुस्त होती. उपासमारीमुळे चेहरा कोमेजतो.” शेफालीने गोरेपणा किंवा तारुण्य टिकवण्यासाठी इंजेक्शन्स घेतल्याच्या अफवा त्याने फेटाळून लावल्या. त्याने पुढे बोलताना सांगितले “तिला अधिक गोरे होण्याची काय गरज होती? कृपया सांगा, असे कोणते इंजेक्शन आहे जे तुम्हाला तरुण ठेवते. जर आज हे खरे असते, तर रतन टाटा अजूनही जिवंत असते.” असे म्हणत कृपया अफवा पसवणे थांबवा असे आवाहनही त्याने केले आहे. शेफाली जरीवालाचा मृत्यू कसा झाला? २७ जून २०२५ रोजी शेफाली जरीवालाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. या दुःखद बातमीने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. शेफालीच्या अचानक जाण्याने तिचा पती पराग त्यागी कित्येक दिवस नैराशात होता. शेफालीने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते की तिला लहान वयातच अपस्माराचा (एपिलेप्सी) त्रास होता. वयाच्या १५ व्या वर्षी तिला पहिल्यांदा अपस्माराचा झटका देखील आला होता. हेही वाचा : Donald Trump-XI JINPING meet: चीनमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची भेट! भेटीतून जगाला मोठा संदेश ; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “आम्ही प्रतिस्पर्धी…”