इंदापुरात विकासकामांचा शो केला नाही

रेडा – इंदापूर तालुक्‍यात ग्रामीण भागाकरीता पाच वर्षात कोट्यवधींचा विकास निधी मंजूर करून आणला. जनसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवूनच विकास कामे करताना आम्ही कोणताही शो केला नाही यापुढेही केवळ विकास कामांवर भर देणार आहे, असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.

इंदापूर तालुक्‍यातील विविध ठिकाणच्या पुनर्वसित गावठाणातील 5 कोटी 62 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन माळवाडी, आजोती येथे आज आमदार भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

आमदार भरणे म्हणाले की, पुनर्वसित गावांचा विकास साधण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निधी आणला जाईल, या भागातील नागरिकांना सुख- सुविधा मिळतील. यासाठी मला काम करायचे आहे.

यावेळी जि.प. बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, महिलाध्यक्षा छाया पडसळकर, ज्येष्ठ नेते किसनराव जावळे, सोशल मीडिया प्रमख हामा पाटील, सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार, बाळासाहेब व्यवहारे, अमोल भिसे, राजाराम सागर, गावचे सरपंच संजय दरदरे, उपसरपंच राहूल साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी आजोती येथे शाळा सरंक्षण भिंत बांधणे, सिमेंट कॉंक्रीट गटार बांधणे, गुरांसाठी पाण्याची टाकी बांधणे अशा कामांचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक अरुण जाधव, आजोती विजय नगरे, माजी उपसरपंच कालीदास दरदरे, सरपंच संजय दरदरे, उपसरपंच राहुल साळुंखे, सदस्य अनिल दरदरे, पोलीस पाटील महादेव गुटाळ, बापु दरदरे, शिवाजी नगरे, मोहन दरदरे, पिंटू शिंदे, पांडुरंग खराडे आदी उपस्थित होते.

आजही कामांचा धडाका…
गुरूवारी (दि.1) डिकसळ, तक्रारवाडी, भिगवण, विरवाडी, धुमाळवाडी व कुंभारगाव, काळेवाडी नं.2 या ठिकाणीही भूमिपूजन समारंभ होणार आहेत. इंदापूर तालुक्‍यात विकासकामांचा धडाका सुरूच राहणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.