विखे-पाटील यांच्याशी भेट झालीच नाही – शरद पवार

उमेदवार निश्‍चितीबाबत गुरुवारी सायंकाळी पक्षाची बैठक

पुणे – “नगर लोकसभा मतदार संघाच्या जागेसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील इच्छुक असल्याची चर्चा असल्याचे मला काही माहिती नाही,’ असे स्पष्ट करुन आपली आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात याबाबत भेट झाल्याचे वृत्त ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावले. उमेदवार निश्‍चितीबाबत गुरुवारी सायंकाळी पक्षाची बैठक होणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.

पुण्यात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या साखर कामगारांच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी पवार बोलत होते.

नगर लोकसभेच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील तिढा वाढताना दिसत आहे. प्रारंभी राष्ट्रवादी पुणे व औरंगाबाद जागेच्या बदल्यात चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरची जागा कॉंग्रेसला सोडली नसल्याचा खुलासा केला होता. अजित पवार यांनीही “जागा राष्ट्रवादीचीच असून संभ्रमावस्था निर्माण करू नका’ असे सांगितले. त्यातच सोमवारी सायंकाळी राधाकृष्ण विखे-पाटील आणि सुजय पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. मात्र, “आमची भेट झालेली नसून हे माध्यमातूनच कळले आहे,’ असे म्हणत पवारांनी या प्रश्‍नाला थेट उत्तर देण्याचे टाळले.

भारताच्या हवाई दलाचे केलेल्या कारवाईत 250 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचा दावा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला होता. त्यावर “सरकारबाहेरील व्यक्तीने या आकड्याविषयी बोलणे योग्य नाही,’ अशी नाराजीही पवारांनी व्यक्त केली. “आमच्या देशाच्या सैन्यदलावर पूर्ण विश्‍वास आहे, त्यामुळे आम्ही राजकारण करत नाही’ असेही पवार यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here