मोनाको – अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीन याने डायमंड लीग मैदानी स्पर्धेतील शंभर मीटर्स शर्यतीत विजेतेपद पटकाविले. 37 वर्षीय खेळाडू गॅटलीनने हे अंतर 9.91 सेकंदात पार केले.
गॅटलीनने 2004 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर उत्तेजक सेवनामध्ये तो दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर 2006 ते 2010 या कालावधीत त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. बंदीचा कालावधी संपल्यानंतर त्याने पुन्हा स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरूवात केली. सध्याचा तो विश्वविजेता धावपटू आहे. येथे त्याने त्याचाच सहकारी नोहा लीस याच्यावर मात केली.
बोत्स्वानाचा ऑलिंपिक रौप्यपदक विजेता खेळाडू निजेल ऍमोसने 800 मीटर्स शर्यतीत प्रथम स्थान घेतले. त्याने ही शर्यत एक मिनिट 41.89 सेकंदात पूर्ण केली. त्याने केनियाच्या फर्ग्युसन रोटीच याच्यावर निसटता विजय मिळविला. फ्रान्सचा विश्वविजेता खेळाडू पिअरी ऍम्ब्रोसी बॉसी याला या शर्यतीत नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. केनियाच्या तिमोती चेरूईट याने 1500 मीटर्स शर्यत 3 मिनिटे 29.97 सेकंदात जिंकली. त्याने युरोपियन विजेता जेकब इंगेब्रिजेस्टेन याला दुसरा क्रमांक मिळाला. अमेरिकेच्या सिडनी मॅकलॉघिनने 400 मीटर्स अडथळा शर्यत 53.32 सेकंदात जिंकली.