सोमेशरनगर – वाघळवाडी, करंजेपूल, करंजे, मगरवाडी, देऊलवाडी, रासकरमळा, चौधरीवाडी सोमेश्वरनगर ही मुख्य बाजारपेठ असल्याने येथे गणेश मूर्ती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली केली होती. दरवर्षीपेक्षा यावर्षी मूर्ती विक्रेत्यांच्या स्टॉलचे प्रमाण जास्त आहे. या मूर्तींमध्ये लालबागचाराजा, दगडूशेठ व विविध आसनावर बसलेल्या श्रींच्या मूर्तींना अधिक मागणी आहे. तसेच डायमंड मूर्तीचे आकर्षण असल्याने ग्राहकांची या मूर्ती खरेदी करण्याकडे कल आहे.