सांगलीत आज 156 नवीन रुग्णांचे निदान

कोरोनाग्रस्तांची पाच हजारकडे वाटचाल

शिराळा (प्रतिनिधी) – सांगली जिल्ह्यात सोमवारी मनपा विभागात 105 नवीन रुग्ण, शहरी विभागात चार नवीन रुग्ण ,आणि ग्रामीण भागात 47 नवीन रुग्ण आढळून आलेत. जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत्व156 ची भर पडल्याने एकूण रुग्ण संख्या 4 हजार 869 वर पोहोचली आहे. दुर्देवाने सांगलीतील कोरूना ग्रस्तांची 5000 कडे वाटचाल सुरू आहे.

एकूण बाधित यांपैकी 2 हजार156 जणांनी कोरोना वर मात केलेली आहे. सोमवारी जिल्ह्यात उपचारा खाली 2 हजार 557 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंत 156 रुग्णांचा मृत्यू झाला आहे .सोमवारी 116 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

मनपा क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 3 हजार 7, शहरी भागातील 335, ग्रामीण भागातील 1527 अशी आहे. सोमवारी rt-pcr टेस्ट 998 घेण्यात आल्या पैकी 62 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.अँटिजेंन टेस्ट 684 घेण्यात आल्या पैकी 94 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. तालुकानिहाय नवीन रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे आटपाडी 15,जत 3, कवठेमहांकाळ 10,मिरज 14, तासगाव 3,वाळवा 6,मनपा 105 असे आहेत.

सोमवारच्या अहवालातील मृतांमध्ये सांगली येथील 85, 65,80, 69,40 वर्षांचे पुरुष, व 85 वर्षांची महिला.मिरज येथील 77 वर्षांचा पुरुष, बुधगाव येथील 48 वर्षांचा पुरुष,कंबलगे येथील 60 वर्षांचा पुरुष,तासगाव येथील 48 वर्षांचा पुरुष, कापूस खेड येथील 40 वर्षांचा पुरुष असा आहे.पॉझिटिव्हपैकी 186 रुग्ण चिंताजनक असून त्यांचेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

आजअखेर ची तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आटपाडी 205,जत 202, कडेगाव 91, कवठेमहांकाळ 178, खानापूर 95,मीरज 389,पलुस 157,शिराळा 223, तासगाव 129, वाळवा 193, मनपा 3 हजार 7 अशी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.