शहरात विविध ठिकाणी अल्पदरात आरोग्य तपासण्या
बिबवेवाडी – डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण औषधे घेतो, मात्र त्यांनी सुचवलेल्या आरोग्य तपासणीला आपण टाळाटाळ करतो, वाटेल बरे…, या मानसिकतेत आपण असतो. त्यातच भर म्हणून आजाराचे खरे मूळ शोधणारे रुग्ण कमी आढळून येतात. यामागे पैशाचा अभाव हे कारण असले तरी अंगावर दुखणे काढण्याची मानसिकता आजही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत डायग्नोपिनकडून अल्पदरात आरोग्य सेवा दिली जात असून अंगावर दुखणे काढण्याच्या मानसिकतेला छेद देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला आरोग्याच्या काही ना काही तक्रारी, व्यथा, आजार आहे. मात्र, कोणता आजार झाला आहे? त्याचे निदान होणे आवश्यक असते. हेच निदान उशिराने कळाल्यास आजार किंवा रोग जीवावर बेतू शकतो. चाचणी, निदान ही प्रक्रिया खर्चीक असल्या कारणानेच याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रुग्णाची काळजी घेत उच्चप्रतीच्या साधनांद्वारे रक्त तपासणीसह विविध आरोग्य चाचण्या डायग्नोपिनद्वारे अल्पदरात केल्या जात आहेत.
फक्त 999 रुपयांपासून सिटी स्कॅन करणारी डायग्नोपिन हे एकमेव डायग्नोस्टिक सेंटर असेल. शहरातील विविध भागांत अल्पदरात डायग्नोपिनने सेवा कार्यरत केली आहे. उच्चप्रतिच्या सेवेमुळे डायग्नोपिनला आयएसओ 9001-2015 हे मानांकनही मिळाले आहे. सर्व मानके आणि मापदंडाचे पालन करून सेवा-सुविधापुरविणारे केंद्र म्हणून डायग्नोपिनची ओळख निर्माण झाली आहे.
अल्पदरात केल्या जाणाऱ्या तपासण्या…
मधुमेह रुग्णांसाठी तीन महिन्यांची गोल्ड स्टॅन्डर्ड टेस्ट, दातांचे मल्टिस्पेशालिस्ट सेटअप, सोनोग्राफी, ई.सी.जी., डिजिटल एक्स-रे, रक्ताच्या तपासण्या तसेच कोविड-19ची ऍन्टीबॉडी आय.जी.जी.टेस्ट देखील येथे केली जाते. डायग्नोपिनच्या सर्व शाखांवरून मोफत होम ब्लड कलेक्शन केले जातात.