बेल्हे – बेल्हे येथे शनिवार (दि.१०) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कल्याण- नगर महामार्गावर बायपास जवळ रस्त्याने जात असताना महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची चैन चोरून दुचाकीवरून दोघांनी हो पोबारा केला. सदर घटना सीसीटीव्ही कैद झाली असून गेल्या महिन्याभरात ही दुसरी घटना बेल्हे परिसरात घडली आहे.
याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निलम सुनिल भालेराव (वय 44 वर्षे धंदा घरकाम रा.बेल्हा ता जुन्नर) या मैञीनी सोबत कामानिमित्त घरातुन बेल्हे गावात जाणेसाठी निघाले होतो. साधारण घरापासून थोडे अंतरावर रामटेक सकुल समोर आलो असताना समोरुन एक मोटारसायकल वरुन दोन इसम त्यांच्या जवळ आले.
व त्यापैकी पाठीमागे बसलेला इसमाने गळ्यातील सोन्याची चैन हिसका मारुन ओढुन चोरुन घेवुन जावुन भालेराव यांनी धक्का देवुन सदर मोटारसायकल वरील इसम हे बोरी बाजुने जोरात निघुन गेले.या धक्यात गळ्यातील अर्धी चैन तुटुन खाली पडली व अर्धी चैन ही सदर मोटार सायकल वरील अज्ञात दोन इसम अंदाजे ७५ हजार रुपये किमतीची चैन घेऊन गेले.
मोटार सायकल वरील बसलेल्या इसमाचे अंगात जर्कीींग व डोक्यात हेलमेट घातलेले होते. भालेराव यांनी आळेफाटा पोलिसांत दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल पवार करत आहेत.