धोनीच्या विजयी षटकाराचा चेंडू सापडला

वानखेडेवरील आसनाचा एमसीए करणार सन्मान

मुंबई –श्रीलंकेविरुद्धच्या 2011 साली झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात ज्या चेंडूवर भारताचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने विजयी षटकार मारला होता तो चेंडू अखेर सापडला आहे. मुंबई क्रिकेट संघटना हा चेंडू क्रिकेट संग्रहालयात जतन करणार असून मैदानातील ज्या आसनावर हा चेंडू पडला होता, त्या जागेला धोनी चेअर असे नाव दिले जाणार आहे. पुढील काळात हे आसन रिक्तच ठेवले जाणार असून याद्वारे धोनीचा खास सन्मान संघटना करणार आहे.

हा चेंडू ज्या व्यक्‍तीकडे आहे ती व्यक्‍ती विक्रमादित्य सुनील गावसकर यांच्या परिचयातील असून त्याच्याशी गावसकर यांचे बोलणे झाले आहे. त्यानुसार हा चेंडू ही व्यक्‍ती संघटनेकडे सुपुर्द करणार आहे.

त्या सामन्यात धोनीने विजयी षटकार फटकावल्यानंतर हा चेंडू हरवला होता. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर या चेंडूचा शोध सुरू झाला. मात्र, हा चेंडू ज्याच्याकडे आहे तो माझा मित्रच असून हा चेंडू संघटनेकडे देण्यास त्याने होकार दिला असल्याची माहिती खुद्द गावसकर यांनीच संघटनेला दिली.

भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून ज्या आसनावर हा चेंडू पडला होता त्या आसनाला धोनीचे नाव दिले जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.