महेंद्रसिंह धोनी संघात असेल तर संघाचा खेळ बहरतो असे विधान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने केले आहे. आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विराटने आपले मत मांडले आहे.
यावेळी धोनीचा संघातील सहभाग आणि खेळाबद्दल बोलताना विराट म्हणाला की, मी संघात आल्यापासून धोनीचा खेळ पाहत शिकतो आहे. त्याच्या देखरेखीखालीच भारतीय संघाने दोन विश्वचषक (टी20 आणि एकदिवसीय) जिंकले आहेत. धोनी सातत्याने संघाचाच विचार करत असतो. संघाला विजयापर्यंत पोहोचवण्याचाच त्याचा प्रयत्न असतो. विरोधी संघाच्या फलंदाजांना कसे बाद करता येईल याकडेच त्याचे सातत्याने लक्ष असते. त्याच बरोबर गोलंदाजांनाही तो सातत्याने मार्गदर्शन करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भुमिका देखील बजावत असतो.