धोनीच्या ग्लोजवरील चिन्हाने गदारोळ; काय आहे आयसीसीचा नियम

नवी दिल्ली – इंग्लंमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या सलामी सामन्यामध्ये भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. या सामन्यात युजवेंद्र चहल आणि रोहित शर्माच्या खेळाच्या उत्तम प्रदर्शनाने क्रिकेटप्रेमी सुखावले आहेत. परंतु, संपूर्ण सामन्यात आणखी एका गोष्टीने लक्ष खेचले ते म्हणजे महेंद्रसिंह धोनीच्या ग्लोजने. मात्र धोनीने या सामन्यात वापरलेले पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटचे सन्मानचिन्ह असणारे ग्लोज वापरू नयेत असे आदेश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिले आहेत.

आयसीसीच्या नियमांनुसार, आंतरराष्ट्रीय सामनादरम्यान कपड्यांवर किंवा अन्य गोष्टींवर राजकीय, धार्मिक अथवा वंशवाद प्रकारचा कोणताही संदेश असू नये. धोनीच्या ग्लोजवरील चिन्हांवरून आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये चालू आहे.

दरम्यान, ट्विटरवर #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डींग असून हा हॅशटॅग वापरून अनेकांनी धोनीच्या या कृतीचे समर्थन केले आहे. धोनीने आपल्या देशाच्या सैन्याप्रती दाखवलेले हे प्रेम असून त्यात काहीच चूक नसल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.