धोनीची निवृत्ती? पाक चाहत्याला हार्टअॅटॅक 

नवी दिल्ली – भारतीय संघाने विश्‍वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली. मात्र, उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. हा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला. यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. यामुळे जगभरातील धोनीचे चाहते चांगलेच निराश झाले आहेत. या वृत्तामुळे भारतातच नव्हेतर चक्क पाकिस्तानातही अनेकांना धक्का बसला आहे. धोनीच्या निवृत्तीच्या वृत्ताने एका पाकिस्तानी चाहत्याला हार्टअॅटॅक आला आहे.

मूळचे पाकिस्तानस्थित कराचीतील मोहम्मद बशीर उर्फ चाचा बशीर हे धोनीचे मोठे चाहते आहेत. आयसीसी विश्‍वचषक स्पर्धेदरम्यान महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीच्या वृत्तांचा चाचा बशीर यांना मोठा धक्का बसला असून त्यामुळे त्यांना हार्टअॅटॅक आला आहे. सध्या त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु असून बशीर यांनी धोनीला निवृत्ती न घेण्याची विनंती केली आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान चाचा बशीर अनेक वेळा भारत-पाक दोन्ही संघाच्या जर्सीमध्ये दिसले आहेत. आणि ते दोन्ही संघासाठी चिअर करत असे. हार्टअॅटॅक येण्याआधी बशीर यांनी धोनीला एक फेसबुकवर व्हिडिओद्वारे आवाहन केले होते. यामध्ये त्यांनी म्हंटले कि, लोक नेहमीच चांगल्या लोकांच्या कामावरच शंका घेतात. अशा लोकांमुळेच अनेक खेळाडूंनी क्रिकेट सोडले.

दरम्यान, चाचा बशीर आणि महेंद्रसिंह धोनीची भेट २०११ च्या विश्वचषकादरम्यान झाली होती. बशीर यांना भारत-पाक सामान पाहायचा होता. परंतु, त्यांना तिकिटे मिळत नव्हती. तेव्हा धोनीने बशीर यांना तिकिटे उपलब्ध करून दिली. तेव्हापासून बशीर धोनीचे चाहते बनले आहेत. चाचा बशीर सध्या अमेरिकेच्या शिकागो शहरात राहत असून तेथे हॉटेलचा व्यवसाय करतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.