‘धोनीचा वाढदिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करावा’ 

नवी दिल्ली – विश्वचषकात भारताने शानदार खेळी केली. परंतु, न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे उपांत्य फेरीतून भारतीय संघ बाहेर पडला. यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. परंतु, यावर धोनीची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. धोनीचे अनेक जण समर्थन करत आहे. यामध्ये टीव्ही शो ‘दिल तो हॅप्पी जी’ फेम अभिनेता अंश बागडीचे विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अंश बागडी म्हणाला कि, सर्व क्रिकेटप्रेमी धोनीवर प्रेम करतात. कारण धोनी भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले. धोनीचे चाहते त्याच्या निवृत्तीचे सेलिब्रेशन करू इच्छितात. एका चाहता होण्याच्या नात्याने मला वाटते कि, धोनीचा वाढदिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करावी. कारण क्रिकेटप्रेमींना धोनीने मोठ्या प्रमाणात आनंदाचे क्षण दिले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकलेला विश्वचषकाचा क्षण आजही लक्षात आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

 

View this post on Instagram

 

Any guess bag mein kya kya ho sakta hai? ? . . . . . #styleoftheday #fashion

A post shared by Ansh Bagri (@anshbagri) on

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.