श्रीनगर – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने बुधवारपासून भारतीय लष्करासोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कर्तव्यावर असतानाचा धोनीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये धोनी बॅटवर स्वाक्षरी देताना दिसत आहे. धोनी सध्या दक्षिण काश्मीरमध्ये लष्करासोबत कार्यरत आहे.
महेंद्रसिंग धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये धोनीने लष्कराचा गणवेश घातला असून तो एका बॅटवर स्वाक्षरी करताना दिसत आहे. ट्विटरवर एका अकाऊंटवरुन हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. श्रीनगरवरुन लेफ्टनंट कर्नल धोनीची एक्सक्ल्युझिव फोटो असे या या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे.
धोनीने वेस्टइंडीज दौऱ्याला न जाता दोन महिन्याचा ब्रेक घेत भारतीय लष्करातील 106 टेरिटोरियल आर्मी बटालियनमध्ये सहभागी झाला. धोनीने पॅरा रेजिमेंटसोबत प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. तो बटालियनसोबत काश्मीर खोऱ्यात 31 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत पेट्रोलिंग आणि गार्डचे कर्तव्य बजावताना दिसून येतो आहे.