मांजरेकर यांनी संवाद साधल्याचा केला दावा
मुंबई – भारतीय संघात पुनरागमन करण्याचे स्वप्न महेंद्रसिंग धोनीचे आजही आहे. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी आवश्यक असलेली तंदुरुस्ती टिकून आहे तोपर्यंत खेळतच राहणार असे मला धोनीनेच सांगितले, असा दावा माजी कसोटी क्रिकेटपटू व समालोचक संजय मांजरेकर यांनी केला आहे.
सराव सत्रात त्याने सहभाग घेत सराव केला. याची माहिती केवळ झारखंड क्रिकेट संघटनेलाच होती. मात्र, त्याच्याशी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्याने आपण पूर्ण फिट असल्याचे सांगितले. तसेच जोपर्यंत एकेरी, दुहेरी धावा घेताना तंदुरुस्ती कमी पडत नाही तोपर्यंत खेळतच राहणार आहे असेही धोनीने सांगितले असल्याचे मांजरेकर म्हणाले. एका कार्यक्रमात मला धोनी भेटला होता व तेव्हा मी त्याला त्याच्या भविष्यातील वाटचालीबाबत विचारले तेव्हा त्याने मनमोकळेपणाने संवाद साधला होता.
मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळण्यासाठी पूर्ण तंदुरुस्त आहे व संघात परतण्यासाठी आयपीएल
स्पर्धेत क्षमतेपेक्षाही जास्त मेहनत करणार असल्याचेही धोनी म्हणाला होता, असेही मांजरेकर यांनी सांगितले आहे. आता धोनी पुढील काळात आयपीएलमध्ये सरस कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करतो का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.