धोनीकडे अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक

गांगुलीने दिले माहीच्या पुनरागमनाचे संकेत

नवी दिल्ली – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याकडे अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक आहे, असे मत व्यक्‍त करतानाच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी धोनीच्या भारतीय संघातील पुनरागमनाचे संकेतही दिले आहेत.

गेल्या वर्षापासून धोनी जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नसला तरीही त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूला सरावाची देखील गरज नाही. त्याने मैदानात पाऊल ठेवले की तो सर्व नियंत्रणात आणेल. धोनीची क्षमता अफाट आहे, त्याच्याकडे अनुभवही मोठा आहे. नवोदितांना त्याच्या याच गुणांचा लाभ होईल. धोनीकडे नेतृत्व असतानाही त्याने कधी नवोदितांना दडपणाखाली ठेवले नाही. त्यांना नैसर्गिक खेळ करण्याची मुभा देताना त्यांच्यावर विश्‍वास ठेवला. भारतीय संघाला सातत्याने विजयाच्या मार्गावर ठेवले, अशा शब्दांत गांगुलीने धोनीचे कौतुक केले आहे.

धोनी जरी आता कर्णधार नसला तरीही विराट कोहली त्याच्याकडून सातत्याने सल्ले घेतो यातच धोनीचे मोठेपण आहे. तो एक महान खेळाडू व क्रिकेटचा जाणकार आहे. केवळ क्रिकेट खेळले म्हणजे त्याची समज आली असे होत नाही तर त्याचा अभ्यास करावा लागतो. प्रतिस्पर्धी खेळाडूंचे कमकुवत दुवे शोधण्याचे धोनीचे कसब आश्‍चर्यचकित करते, असेही गांगुली म्हणाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.