सौरव गांगुलीकडून संकेत
नवी दिल्ली – माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने त्याच्या कारकिर्दीबाबत तसेच निर्णयाबाबत कर्णधार विराट कोहली याच्याशी निश्चितच चर्चा केली असेल, असे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले आहेत.
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर धोनीने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सातत्याने सुरू असतात, त्यामुळे माध्यमांच्या प्रश्नांना वारंवार सामोरे जावे लागत असल्याने आज गांगुलीने अप्रत्यक्षपणे धोनीने कोहलीशी चर्चा केलीच असे सांगत चाहत्यांना आणखीनच संभ्रमात टाकले आहे.
धोनीने कोहलीसह निवड समितीच्या सदस्यांशीही काही गोष्टींवर चर्चा केली असेल. धोनीसारखा खेळाडू पुन्हा मिळणे कठीण आहे. यष्टीरक्षक म्हणून धोनी य़शस्वी तर ठरलाच आहे पण त्याचे नेतृत्व देखील देशाची शान वाढविणारे ठरले आहे. 2007 मध्ये त्याने भारतीय संघाला पहिल्यांदाच टी-20 विश्वकरंडक जिंकून दिला. यानंतर 2011 मध्ये मुख्य विश्वकरंडक देखील त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने जिंकला. दुसरा धोनी लवकर मिळणार नाही. पुढे खेळायचे की निवृत्ती घ्यायची हे ठरवण्याचा त्याला अधिकार आहे, असेही गांगुलीने सांगितले.