धोनी स्वस्तात सुटला त्याच्यावर १-२ सामान्यांची बंदी घालायला हवी होती : सेहवाग

शेवटच्या चेंडूपर्यंत उत्सुकता आणि वादाने रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 4 गडी राखून पराभव केला होता. अखेरच्या चेंडूवर 3 धावा हव्या असताना सॅंटनेरने षटकार ठोकून चेन्नईच्या संघाला विजय मिळवून दिला. मात्र, सामन्या दरम्यान नो बॉलचा झालेला वाद कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या चांगलाच अंगलट आला. धोनीने आचासहिंतेच्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्याच्यावर ५०% दंड आकारण्यात आला आहे.

दरम्यान, माजी क्रिकटपटू वीरेंद्र सेहवागने धोनी खूप स्वस्तात सुटला त्याच्यावर १/२ सामान्यांची बंदी घालायला हवी होती. असे म्हटले आहे. तो समोर म्हणाला धोनी आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघासाठी वागला तसा भारतीय संघासाठी वागला असता तर मला आनंद झाला असता. धोनी चेन्नईच्या संघासाठी जास्तच भावनिक झाला. दोन फलंदाज खेळपट्टीवर उभे असाताना धोनीला मैदानावर जाण्याची आवश्यकता नव्हती. परंतु धोनी याप्रकरणी खूप स्वस्तात सुटला आहे. धोनीवर 1-2 सामन्यांची बंदी झाली असती, तर यामुळे इतर खेळाडूंना धडा मिळाला असता.

नेमके काय घडले होते सामन्यात ?

अखेरच्या तीन चेंडूवर चेन्नईला केवळ 8 धावा हव्या होत्या. त्यावेळी मिशेल सॅंटनेर फलंदाजी करत होता. स्टोक्‍सने टाकलेला चौथा चेंडू कमरेच्या वरून जात होता म्हणून मुख्य पंच उल्हास गंधे यांनी नो बॉल ठरवला. परंतु, लेग अम्पायर ब्रूस ऑक्‍सनफर्ड यांनी तो नोबॉल नसल्याचे सांगितल्याने वाद झाला. त्यामुळे सामन्यादरम्यान वाद सुरू झाला. या वादात फलंदाज रविंद्र जडेजा आणि मिशेल सॅंटनेर हेदेखील सहभागी झाले. यावेळी महेंद्रसिंग धोनीनेही मैदानात येऊन वाद घातला. पण लेग अम्पायरचाच निर्णय अंतिम ठेवण्यात आला. यामुळे धोनी नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्याच्यावर दंड आकारण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.