धोनीने राष्ट्रीयता बदलावी, आम्ही त्याला संघात सामील करू; किवींची ऑफर 

मॅंचेस्टर – शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत रवींद्र जडेजा याने भारतास विजय मिळवून देण्यासाठी शर्थीची झुंज दिली. मात्र, त्याची ही झुंज संघास अंतिम फेरी गाठण्यासाठी अपुरीच पडली. आणि भारत विश्वचषकातून बाहेर पडला.  भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले. यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजाची तंबूत परतल्यानंतर विजयची आशा पूर्ण मावळली. भारताचा १८ धावांनी पराभव करत न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठली. यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने धोनीला एक ऑफर दिली आहे.

किवीच्या कर्णधाराला विचारण्यात आले कि, भारतीय संघाचे तुम्ही कर्णधार असता तर धोनीला ११ मध्ये सामील केले असते का? यावर विल्यमसन म्हणाला, धोनीमध्ये न्यूझीलंडकडून खेळण्याची क्षमता नाही. परंतु, तो जागतिक स्तरावरील खेळाडू आहे. जर मी भारतीय संघाचा कर्णधार असतो तर या स्तरावरील त्याच्या अनुभवाला अधिक महत्व दिले असते. दोन्हीही दिवस धोनीने संघाची मदत केली. विल्यमसन पुढे म्हणाले, जर धोनीने राष्ट्रीयता बदलली तर आम्ही त्याला संघात सामील करण्याचा विचार करू, असे त्याने सांगितले.

दरम्यान, विजयासाठी 240 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 49.3 षटकांत 221 धावांवर आटोपला. न्यूझीलंडने 50 षटकांत 8 बाद 239 धावा केल्या होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.