टेनिसमध्येही धोनीच फिनिशर

रांची: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बेस्ट फिनिशर का म्हणतात, याचे उत्तर तो केवळ क्रिकेटमध्येच सरस खेळतो म्हणून नव्हे तर तो जे काही करतो त्यात त्याला तोड नसते आणि यश आपोआप त्याच्याकडे चालत येते. क्रिकेटच्या मैदानावर नव्हे तर टेनिसच्या कोर्टवर देखील धोनीने आपले वर्चस्व सिद्ध केले.

जेएससीए कंट्री क्‍लब टेनिस स्पर्धेत धोनीने सुमितकुमार बजाज याच्या साथीत मायकल व चाल्से या जोडीला 6-0, 6-0 असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करत आपले टेनिसमधील कौशल्य देखील सिद्ध केले. क्रिकेटच्या मैदानावर नाही तर टेनिस कोर्टवर धोनीचा खेळ पाहण्यासाठी शेकडो चाहते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.