सुशांतच्या निधनामुळे धोनी अजूनही धक्‍क्‍यात…

रांची – सुशांतसिंह राजपूत याच्या निधनाचे वृत्त ऐकल्यानंतर 24 तास उलटून गेले असले तरीही महेंद्रसिंग धोनी अजूनही या धक्‍क्‍यातून सावरलेला नाही. सुशांतबाबतचे वृत्त समजले आणि माझा विश्‍वासच बसला नाही. “काय बोलू’ माझ्याकडे शब्दच नाहीत, अशा शब्दांत धोनीने आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

सुशांतने माझ्या बायोपिकमध्ये जो अभिनय केला तो अवर्णनीय होता. त्यावेळी माझ्याशी चर्चा करता यावी यासाठी तो 15 दिवस माझ्याबरोबर राहिला. त्याच्या प्रश्‍नांना कंटाळून मी एकदा त्याला खडसावलेही होते. मात्र, त्यातूनच त्याची कामाबद्दलची निष्ठा दिसून आली. त्याने विचारलेले प्रश्‍न किती महत्त्वाचे होते हे मला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समजले. त्याने माझा अभिनय केला असे म्हणण्यापेक्षा माझेच आयुष्य तो जगला असे म्हणावेसे वाटते, अशा शब्दांत धोनीने सुशांतचे कौतुक केले.

प्रत्येकाच्या आयुष्यात अपयशी कालखंड येतो. त्यातून बाहेर येण्यासाठी मानसिकरित्या खूपच मेहनत करावी लागते. सुशांतच्या आयुष्यातही असा कालखंड आला असावा पण आत्महत्या हे कोणत्याही संकटाचे उत्तर असू शकत नाही. रूपेरी पडद्यावर मला स्वतःला पाहताना मजा आली. त्यावेळी सुशांतने या भूमिकेसाठी किती मेहनत घेतली याचाही साक्षात्कार झाला. त्याने वयाची पस्तीशीही पार केली नव्हती. असे काय घडले की त्याने इतका टोकाचा निर्णय घेतला, असेही धोनीने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.