श्रीनगर: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आणि मानद लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनी आपल्या लष्करी कर्तव्याला दक्षिण काश्मीरमध्ये रुजू झाला असून यावेळी तो इतर लष्करी जवानांप्रमाणे कर्तव्यदक्षता, गस्त आणि तत्सम कर्तव्ये पार पाडताना दिसून येणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या 106 टी ए या बटालियन सोबत दोन आठवडे कर्तव्य बजावनार आहे. धोनी हा याठिकाणी बुधवारी सकाळी दाखल झाल्याची माहिती लष्कराच्या एका प्रवक्त्याने सांगितले.