धोनी धुर्त कर्णधार – पोलार्ड

नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी मी पाहिलेला सर्वात धुर्त कर्णधार आहे, असे वेस्ट इंडिजचा कर्णधार कॅरन पोलार्ड याने म्हणले आहे.

वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघादरम्यान आता एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार कॅरन पोलार्डदेखील धोनीचा चाहता आहे. धोनी हा सर्वात धुर्त क्रिकेटपटू आहे.
धोनीने इंग्लंडमध्ये झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तो निवृत्त होणार असल्याची चर्चा सुरु होती. पण खुद्द धोनीने निवृत्ती संदर्भात अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये धोनी खेळणार का यासंदर्भात देखील चर्चा सुरु आहेत.
धोनी एक महान खेळाडू आहे, त्याच्या सारखा खेळाडू पुन्हा मिळणार नाही. ऋषभ पंतकडे गुणवत्ता आहे, पण त्याने जबाबदारी ओळखली पाहिजे, आततायीपणा करु नये, तरच तो यशस्वी होईल, असा सल्लाही पोलार्डने दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.