बलिया हत्याकांडातील मुख्य आरोपी धीरेंद्र सिंहसह तीन जण गजाआड

बलिया – बलिया हत्याकांडातील मुख्य आरोपी धीरेंद्र सिंह याच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने राज्याची राजधानी लखनऊमधून धीरेंद्रला रविवारी सकाळी अटक केली, तर इतर दोन आरोपींना बलिया शहरातील वैशाली भागातून ताब्यात घेण्यात आले.

धीरेंद्र सिंह, संतोष यादव आणि अमरजीत यादव अशी आज अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ)चे अमिताभ यश म्हणाले, गोळीबाराच्या घटनेनंतर धीरेंद्र घटनास्थळावरून फरार होता. त्याच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले होते. मुख्य आरोपी धीरेंद्र प्रताप सिंह याला रविवारी सकाळी लखनऊमधील पॉलिटेक्‍निक भागातून ताब्यात घेण्यात आले.

तसेच बलिया येथील वैशाली भागातून रविवारी सकाळी आरोपी संतोष यादव आणि अमरजीत यादव यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुख्य आरोपी धीरेंद्र प्रताप सिंहचा भाऊ नरेंद्र प्रताप सिंह आणि देवेंद्र प्रताप सिंह यांचा समावेश आहे.

दरम्यान, धीरेंद्र सिंहने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत स्वत: निष्पाप असल्याचे सांगितले होते. धीरेंद्र सिंह याचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे 10 पथके काम करत होते. आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) आणि गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे याअगोदरच पोलिसांनी जाहीर केले होते. बलिया गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण आठ जणांना अटक केली आहे.

बलियामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसमोरच भाजपाच्या कार्यकर्त्याने एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.