मुंबई – दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे डीएचएफएल कंपनीच्या शेअरचा भाव आज मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे 5 टक्क्यावर सर्किट लिमिट लावावे लागले.पीरामल समुहातील कंपनीने डीएचएफएलचे अधिग्रहण केले आहे.
रिझर्व बॅंकेने या व्यवहाराला मंजुरी दिली आहे. डीएचएफएलच्या खराब खर्चाच्या व्यवस्थापनासाठी आम्ही राष्ट्रीय कंपनी लवादाकडे प्रस्ताव सादर केला आहे असे कंपनीने सांगितल्यानंतर या कंपनीच्या शेअरच्या भावात वाढ झाली.