धायरीकरांना आता पाण्यासाठी मोजावे लागणार पैसे 

दैनंदिन वापराचे पाणी प्रती टॅंकर 200 रुपयांना घ्यावे लागणार : स्थायीसमोर प्रस्ताव

पुणे – दैनंदिन वापरासाठी धायरी परिसरातील नागारिकांना महापालिकेकडून टॅंकरद्बारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, त्यासाठी आता प्रती टॅंकर 200 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याबाबचा प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, समान पाणीपुरवठा योजनेच्या कामासोबतच धायरीतही जलवाहिन्या टाकून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. धायरी गाव महापालिका हद्दीत आले, तरी या भागात अजूनही जिल्हा परिषदेच्या योजनेतूनच पाणीपुरवठा करण्यात येत होता. तर आसपासच्या भागात खासगी टॅंकरद्वारे पाणी घ्यावे लागत होते. मात्र, हे पाणी खडकवासला कालव्यातून चोरी करून दिले जात असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली होती.

मात्र, त्याच वेळी या भागात आवश्‍यक आणि पुरेसा पाणीपुरवठा महापालिकेस करता आला नाही. त्यामुळे नागरिकांनी आंदोलन उभे केले होते. त्यावेळी प्रशासनाने तातडीने धायरी फाटा येथे टॅंकर पॉइंट उभारला आहे. त्याद्वारे दिवसाला 80 ते 100 टॅंकर फेऱ्यांद्वारे पाणी दिले जात आहे. तर, खासगी टॅंकरचालक तसेच नागरिकांकडूनही या भागासाठी रॉ वॉटरची मागणी केली जात आहे. मात्र, हे पाणी मोफत देणे शक्‍य नसल्याने प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.