बॉलीवूडमधील प्रसिद्ध डायरेक्टर अमर कौशिक पुन्हा एकदा हॉरर-कॉमेडी चित्रपटाची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. 2018मध्ये प्रदर्शित झालेल्या “स्त्री’ चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर ते आता “भेडिया’ हा चित्रपट साकारत आहेत.
या चित्रपटासाठी अमर कौशिक यांनी वरुण धवन आणि कृती सेनन या जोडीची निवड केली आहे. सध्या या चित्रपटाबाबत आणखी माहिती उपलब्ध झाली नाही; परंतु या वरुण एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
अमर कौशिक यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान करणार आहेत. तर नीरेन भट्ट यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे.
View this post on Instagram
Be like water making its way through cracks- Bruce lee 🌊 @discoversoneva @ncstravels
या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी 2021 मध्ये सुरू होणार आहे. दरम्यान, वरुण आणि कृती यांची जोडी “दिलवाले’ चित्रपटात पहिल्यांदा झळकली होती. या जोडीला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. यानंतर ते दोघे पुन्हा एकदा “भेडिया’ चित्रपटात काम करणार आहेत.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कृती लवकरच “मिमी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय अक्षयकुमारसोबत ती “बच्चन पांडे’ मध्येही झळकणार आहे.