‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी भाजप सरकारच्या डिजिटल योजनेची पोलखोल केल्यानंतर आता पुन्हा देशातील पहिल्या कॅशलेस गावाची परिस्थिती समोर आली आहे. मोदी सरकारने पहिले कॅशलेस गाव म्हणून ज्या ‘धसई’ गावाचा गाजावाजा केला. ते गाव १ टक्का सुद्धा कॅशलेस नसल्याचे समोर आले आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, देशातील पहिलं कॅशलेस गाव ‘धसई’ची भाजपने मोठ्या प्रमाणात जाहिरात केली होती. मात्र धसई गावातील नागरिकांना कॅशलेस व्यवहार म्हणजे काय? हेच माहित नाही. तसेच गावात बँक, एटीएम नसून व्यवहार पूर्णपणे ‘कॅश’व्दारेचं होतात. एका वृत्तवाहिनीने याबाबत पाहणी केली असता  तेथील ग्रामस्थांनी ‘गाव कॅशलेस झाले नसून राजकीय लोकांनी फक्त फायदा घेतला’, असे मत व्यक्त केले आहे. देशातील १०० टक्के कॅशलेस गाव म्हणून भाजपने या गावाची जोरदार जाहिरात केली होती, मात्र या खाजगी वाहिनीच्या वृत्तांकानुसार विरोधी वास्तव समोर आले आहे.

राज ठाकरेंची मोठी पोलखोल ; हरिसाल डिजिटल जाहिरातीमधील मुलगा केला हजर

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.