हेमामालिनींच्या प्रचारात उतरले धर्मेंद्र

मथुरा – मथुरा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार अभिनेत्री हेमामालिनी यांच्या प्रचारार्थ त्यांचे पती धर्मेंद्र हे स्वत: प्रचारात उतरले आहेत. आज त्यांची सोंख गावात प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना धर्मेंद्र यांनी गेल्या निवडणुकीत हेमामालिनी यांना ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. यावेळीही त्यांनाच विजयी करा असे आवाहन करताना ते म्हणाले की तुम्हाला त्यांच्या विरोधात अनेक गैरसमज पसरणारा प्रचार केला जाईल पण त्यावर अजिबात विश्‍वास न ठेवता त्यांच्याच पाठीशी उभे राहा असे आवाहन त्यांनी केले. आपण स्वता शेतकरी आहोत आणि आपण आजही शेतात काम करतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांची आपल्याला जाण आहे असे ते म्हणाले. मथुरेच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भाजपने धर्मेंद्र यांनाच प्रचारात उतरवल्यामुळे येथील प्रचारात रंगत निर्माण झाली आहे. या मतदार संघात येत्या गुरूवारी मतदान होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.