वाघोली : वाघोली तालुका हवेली येथील धर्मेंद्र सातव पाटील यांची प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली असून त्यांना निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांच्या हस्ते देण्यात आले.
शेगाव बुलढाणा येथे झालेल्या प्रहार दिव्यांग संघटनेच्या महाराष्ट्रातील पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित महाराष्ट्रातील बहुसंख्य प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, राज्य समन्वयक, विभाग प्रमुख यांच्या मागणीवरून धर्मेंद्र सातव पाटील यांची प्रहार संघटनेचे माजी आमदार बच्चुभाऊ कडू यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली . निवड झाल्यानंतर प्रहार संघटनेच्यावतीने सातव यांचा सत्कार करण्यात आला.
धर्मेंद्र सातव हे गेले 30 वर्षापासून दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी सनदशीर मार्गाने लढा देत आहे. प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे संस्थापक सदस्य असून संघटनेच्या स्थापनेपासून एकनिष्ठपणे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आगामी काळात आमदार बच्चू कडू यांचे नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांच्या न्यायिक हक्कासाठी काम करणार असल्याचे धर्मेंद्र सातव यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल राज्यभरातून सातव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वाघोली येथे बाळासाहेब सातव, पांडुरंग सातव, सुनिता राजीवडे , सुरेखा सातव, राजश्री सातव, स्वाती सातव ,पूनम सातव, गुरुनाथ सातव यांच्या हस्ते निवडीबद्दल सातव यांचा सत्कार करण्यात आला. सातव यांच्या निवडीबद्दल पुणे जिल्हा भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सातव, पुणे जिल्हा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश सातव पाटील, वाघोली ची माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील, चिराग राजेंद्र सातव पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.