गेल्या काही दिवसांपासून साऊथ सुपरस्टार अभिनेता धनुष अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. काही काळापूर्वी मदुराई येथील एका जोडप्याने धनुष त्यांचा मुलगा असल्याचा दावा केला होता. हे प्रकरण सुमारे 5 वर्षे जुने आहे, ज्याच्या कारवाईत अभिनेत्याला मद्रास उच्च न्यायालयाने समन्स बजावले होते. कोर्टाकडून समन्स मिळाल्यानंतर आता धनुषनेही या दाम्पत्यावर कारवाई केली आहे.
मदुराईच्या कैथिरेसन आणि मीनाक्षी यांनी धनुषचे पालक असल्याचा दावा केला आहे. धनुष आणि त्याचे वडील कस्तुरी राजा यांनी या जोडप्याचा दावा फेटाळून लावत त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ही कायदेशीर नोटीस धनुषच्या वतीने त्याचे वकील एस हाजा मोहिद्दीन गिश्ती यांनी पाठवली आहे. नोटीसद्वारे दाम्पत्याला धनुषबद्दल अशा खोट्या गोष्टी न पसरविण्याचे सांगण्यात आले आहे.