धनखर यांनी घेतली बंगालच्या राज्यपालपदाची शपथ

कोलकता – पश्‍चिम बंगालचे 28 वे राज्यपाल म्हणून मंगळवारी जगदीप धनखर यांनी शपथ घेतली. आधीचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्या जागी त्यांची नुकतीच नियुक्ती झाली. येथील राजभवनात झालेल्या सोहळ्यात कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी.बी.एन.राधाकृष्णन्‌ यांनी धनखर यांना राज्यपालपदाची शपथ दिली. त्या सोहळ्याला पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते.

राजस्थानचे माजी खासदार असणारे धनखर सर्वोच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील आहेत. त्रिपाठी यांच्या कार्यकाळात त्यांचा सातत्याने विविध मुद्‌द्‌यांवरून ममतांशी संघर्ष झाला. मोदी सरकारच्या निर्देशावरून त्रिपाठी राज्य सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप ममतांनी वारंवार केला. आता धनखर आणि ममतांमधील संबंध सुरळित राहणार का, याबाबत उत्सुकता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.