ऍड. अशोक पवार यांना धनगर समाजाचा पाठिंबा

न्हावरे येथे फेटा, घोंगडी, काठी देऊन केला सन्मान

न्हावरे – न्हावरे आणि पंचक्रोशीतील सर्व धनगर समाज शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार ऍड. अशोक पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन उरळगावचे माजी उपसरपंच अशोक कोळपे यांनी केले.

परिसराचा विकास राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळेच झाला – न्हावरे (ता. शिरुर) येथील मुख्य चौकात ऍड. अशोक पवार यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत कोळपे बोलत होते. कोळपे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाच्या नावाखाली धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. मागच्या विधानसभेच्या वेळेला आताच्या सत्ताधाऱ्यांनी धनगर समाजाचे मतदान मिळवून घेण्यासाठी धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. प्रत्यक्ष मात्र, पाच वर्षांत धनगर आरक्षण दिलेच नाही. त्यामुळे धनगर समाज सत्ताधाऱ्यांवर नाराज असून, न्हावरे आणि पंचक्रोशीतील सर्व धनगर समाज माजी आमदार ऍड. अशोक पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने कायमच विकासाचे राजकारण केले आहे. परिसराचा विकास राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळेच झाला आहे, असे कोळपे यांनी सांगितले.

यावेळी पंचक्रोशीतील न्हावरे, आलेगाव पागा, उरळगाव, गुनाट, निर्वी येथील धनगर समाजाने माजी आमदार अशोक पवार यांना जाहीर पाठिंबा दिला. तसेच पवार यांचा फेटा, घोंगडी आणि काठी देऊन सन्मान केला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब कोरेकर, मंदा सरके, शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सागर राजे निंबाळकर, घोडगंगाचे संचालक गोविंदराजे निंबाळकर, बिरा शेंडगे, बाळासाहेब कोरेकर, पंचायत समिती सदस्य राणी शेंडगे, महादेव जाधव, ग्रामपंचायत सदस्य गोरख तांबे, भिवाजी तांबे, आनंदराव कोकरे, दिलीप सरके, तात्या शेंडगे, संतोष जांभळकर, बाबुराव तांबे, सावळा शेंडगे, रमा शेंडगे, सत्ता शेंडगे, सोमनाथ शेंडगे, तुळशीराम बिडगर आदी मान्यवर व मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील धनगर समाजातील युवक उपस्थित होते.

सर्वसामान्य जनतेने संधी दिल्यास आगामी काळात धनगर समाजाचे व सामान्य जनतेचे प्रश्‍न पोटतिडकीने विधानसभेत मांडणार आहे. तसेच चासकमान डाव्या कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळवून देणार आहे.
– ऍड. अशोक पवार, माजी आमदार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)