रांची – बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचा सदस्य आणि 10 लाखाचे इनाम जाहीर असणारा नक्षलवादी प्रशांत माझी याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याबरोबर त्याच्या पाच साथिदारांना बेड्या ठोकण्यात आल्या. गिरीधचे पोलिस अधिक्षक अमित रेणु यांनी या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र तपासात व्यस्त असल्याचे सांगत त्यांनी अधिक माहिती नंतर देईन, असे सांगितले.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माझीकडून विशेष पथकाने एक एके 47 रायफलही जप्त केली आहे. त्याच्यासोबत अटक केलेल्यांमध्ये दोन महिला आणि तीन पुरूषांचा समावेश आहे. या भागातून माओवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी राबवलेल्या मोहीमेला माझी याच्या अटकेने मोठे यश मिळाल्याचे मानले जाते.
पोलिसांना मिळालेल्या विश्वासनीय बातमीनुसार, पोलिस अधिक्षक अमित रेणू यांनी विशेष पथक स्थापन करून पर्वतपूर आणि पांडेयदिध या गावांमध्ये गजाआड करण्यात आले. त्यानंतर त्याला तपासासाठी अज्ञातस्थळी नेण्यात आले.
या दोन गावांमध्ये 25 लाखांचे इनाम जाहीर असणारा आणखी एक माओवादी अजय महातो याला पकडण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाने मोठा सेटअप उभारत आहेत. त्याच्या कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर माओवाद्यांनी 23 डिसेंबरला हल्ला करून दहशत माजवली होती. या बांधकामाविरोधात ग्रामस्थांना पुढे करून माओवाद्यांनी निदर्शने सुरू केली होती. त्यासाठी आलेला माझी पोलिसांच्या जाळ्यात सापडला.