मुंबई : एकीकडे आयपीएलची धूम सुरु आहे. मैदानात जय पराजय सुरु आहेत तर दुसरीकडे खेळाडू आणि त्यांची पत्नी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यात दंग आहेत. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती भांगडा डान्स करताना दिसून येत आहे. धनश्रीच्या व्हिडीओने सोशल मीडियावर जाळ आणि धूर संगटच काढला आहे.
युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यानंतर दोघं विवाहबंधनात अडकलेत.
धनश्रीने इन्स्टाग्रामवर एक शानदार व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती भांगडा नृत्य करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
धनश्री वर्मा अक्षय कुमार आणि करीना कपूरच्या सौदा खरा खरा या गाण्यावर डान्स करत आहे. लाल टी शर्ट आणि काळ्या रंगाची पँन्ट तिने परिधान केलीय. या कलर कॉम्बिनेशनमध्ये ती कमालीची सुंदर आहे. तसंच या डान्समध्ये तिने सुंदर एक्सप्रेशन दिले आहेत. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूपच आवडलाय.
https://www.instagram.com/p/CNwgfdypOiL/?utm_source=ig_web_copy_link
धनश्रीने काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा खेळाडू श्रेयस अय्यरसोबत ठेका धरला होता. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ‘More skills on the board 🔥 You’ve aced it just like hitting a perfect six @shreyas41 ‘ असं कॅप्शन देत धनश्रीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला होता. धनश्रीसोबत श्रेयसनंही एकदम परफेक्ट स्टेप्स केल्यानं चाहते थक्क झाले होते.