पुणे- अभिनेत्री धनश्री काडगावर प्रेग्नंट आहे. या संदर्भातील माहिती तिने सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ पोस्ट करत दिली आहे. तिचा नवरा दुर्वेश देशमुखच्या वाढदिवसानिमित्त हे गिफ्ट आहे, असंही तिनं लिहिलं आहे.
बर्याच लोकांना हा व्हिडिओ आवडला. आम्ही नुकतीच सर्व खबरदारीसह व्हिडिओ शूट केला आहे. व्हिडिओ शूट करण्यामध्ये काही लोकांची टीम होती. या शूटसाठी मेकअप व्यक्तीपासून कॅमेरामॅनपर्यंतच्या सर्व टीमची कोरोना चाचणी झाली आणि त्यानंतर शूटमध्ये भाग घेतला, असं भाग्यश्रीने सांगितलं.
झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेत तिने वहिनीसाहेब ही भुमिका केली होती. त्या भुमिकेवर महाराष्ट्राने प्रेम केलं. ती भुमिका घराघरात पोहचवण्यासाठी घनश्रीने प्रचंड मेहनत घेतली होती. त्या भूमिकेसाठी कोल्हापूरी भाषेचा लहेजा शिकली. काही कारणात्सव तिने मालिका सोडली. मध्यंंतरी तिने युवा डांन्सिंग क्विनचा मंच गाजवला होता.