मुंबई- अभिनेत्री धनश्री काडगावकरने झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला ही मालिका महत्वाच्या टप्प्यात मालिका सोडली. ती गरोदर आहे. तिचं सध्या मॅटर्निटी शुट प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांना भेटण्यासाठी ती इंस्टाग्रामवर लाईव्ह आली होती. त्यावेळी तिने चाहत्यांशी मनमुराद गप्पा केल्या. त्याचबरोबर तिने एक व्हीडियोसुद्धा शेअर केला आहे. त्यात ती मालिकेविषयी बोलते आहे.
मालिकेत ट्विस्ट घेऊन येणारा बदल कालच्या भागात तुम्ही पाहिलेच असेल. गेले 3 वर्ष नंदिता हे पात्र मी साकारत होते. मला खूप मजा आली. मला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले, आशिर्वाद मिळाले, असं म्हणत तिने प्रेक्षकांचे आभार मानले.
माझ्या जीवनात आता त्यापेक्षाही महत्वाचा क्षण(इथे तिला गरोदरपणाबद्दल सांगायचं होते) अाला आहे. त्यामुळे मी हे पात्र नाही करू शकणार. माझ्या ऐवजी माधुरी पवार ही अभिनेत्री आता हे पात्र साकारणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे की जसे तुम्ही मला प्रेम, आशिर्वाद दिलात, तसेच प्रेम तिलाही द्या, असे पुढे धनश्री म्हणाली.
धनश्रीने जरी गरोदरपणामुळे मालिका सोडली असली तरी तीचे मालिकेवरील प्रेम कमी झाले नाही, असे तिच्या बोलण्यावरून दिसते. मालिकेत जरी तिने खलनायिकेची भूमिका साकारली असली तरी तिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला होता. नवीन नंदिता देखील प्रेक्षकांना तितकेच मनोरंजन करेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
View this post on Instagram