पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर धनंजय मुंडेंचे मोठे विधान; म्हणाले…

मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यामध्ये विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत आहे. यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेत संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सावध प्रतिक्रिया दिली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

पूजा चव्हाणची हत्या नाही तर तो पूर्णपणे आत्महत्येचा प्रकार आहे, असे धनंजय मुंडे यांनी ठामपणे सांगितले. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत असल्या तरी त्यावर आता बोलणं योग्य ठरणार नाही. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. त्यांच्या चौकशीत जे सत्य आहे ते समोर येईलच. एकदा सगळं काही स्पष्ट झालं की त्यावर अधिक बोलता येईल, असेही मुंडे पुढे म्हणाले.

यापूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर देखील लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून त्यांना लक्ष्य करण्यात आले होते. तसेच उच्चस्तरीय चौकशीची मागणी करून त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रह धरला होता. मात्र तक्रार करणाऱ्या तरुणीने आपण कोणाच्या दबाला बळी न पडता तक्रार मागे घेत असल्याचे म्हटले होते.

दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत आहे. यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेत संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.