बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुंडे यांच्यावर पूस गावातील शेतकऱ्यांना आमिष दाखवून जमीन व्यवहारात फसवणू केली, असा आरोप करत मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन देखील सुरु केलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखीच भर पडली आहे.