मुंबई : समाजसेविका अंजली दमानिया या अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडें यांच्याविरुध्द पुरावे देत आरोपांची राळ उडवित असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र मुडेंच्या पाठिशी ठाम उभे राहिल्याने मुंडेंना अभय मिळणार असल्याचे अधिकृत राष्ट्रवादीचे नेतेमंडळींचे मत आहे. हर्षवर्धन देशमुखांची हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंची खप्पा मर्जी असलेला वाल्मिकी कराड हा गजाआड असला तरीही त्याने याप्रकरणांतील तपासांत पोलिसांकडे कबुलीजबाब नोंदविताना कुठेही मुंडेंचे धनंजय मुंडेंचे नाव घेतले नाही.
त्याबद्दल भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तर वाल्मिकी कराडचा मुंडे हे आका व त्यांच्या आशीर्वादाने कराड बीड व आजूबाजूच्या गावातून खंडणी उकळत असे आरोप केला होता.त्याबद्दल शोध घेतानाही पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला तथ्य आढळले नाही.त्यामुळे आका हे काल्पनिक पात्र असल्याच्या मतापर्यंत पोलिस आले आहेत. मुंडेंच्यावर कृषी खरेदी प्रकरणांत खोटी आकडेवारी देत शासनाच्या पैशांचा अपव्यय व घोटाळा केल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेविका अंजली दमानियांचा होता. पण त्याप्रकरणाचा प्राथमिक पोलिस अहवालही निरंक आहे.
मुंडेंचे सगळे संबधित पेपर्स तपासले असताना त्यात लिखीत स्वरुपात कुठेही नोंदी केल्याचे आढळून येत नसल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे.दमानिया या प्रकरणांत मुंडेंविरोधी आपल्याकडे कागदपत्र व ऑडिओ क्लीप असल्याचे छातीठोकपणे सांगत आपण यासंदर्भात कोर्टात धाव घेणार असल्याचे सांगत आहेत. याबाबत राष्ट्रवादीचा कानोसा घेतला असताना नेतेमंडळीत खसखस पिकताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार केवळ तोंडी आरोप झालेत म्हणून सत्त्य न मानता पुरावे कोर्टाने ग्राह्य तरच मुंडेविरोधी कारवाई करण्याची पावले उचलतील अशी चर्चा करत आहेत.
ज्येष्ठ माजी मंत्री छगन भुजबळही मुंडेंना दोषी न मानता त्यांचे ठाम समर्थन करावे या मताचे आहेत.त्यामुळे मुंडेना मंत्रीपदी राहण्यासाठी अभय मिळाल्याचे मत व्यक्त होत आहे.तथापि विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार मुंडेंच्याबाबत दिल्लीतून निर्णय येण्याच्या प्रतिक्षेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमख्यमंत्री अजित पवार असल्याचे भाजपच्या गोटातील माहितीवरुन सागितले जात आहे.