पाथर्डीत धनंजय मुंडेंच्या निषेधार्थ मोर्चा

गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
पाथर्डी  (प्रतिनिधी) –ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याबद्दल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावी, या मागणीसाठी पाथर्डीत मोर्चा काढण्यात आला.
शहरातील वसंतराव नाईक पुतळ्यापासून सकाळी मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. धनंजय मुंडे मुर्दाबाद, परळीच्या गुंडाचे करायचे काय, खाली डोके वर पाय, अशी घोषणाबाजी करत मोर्चेकरी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचले.

पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी आंदोलनकर्त्यांना पोलीस ठाण्याच्या गेटवर मज्जाव करून आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने शांतता राखा, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सूचित केले. यावर आंदोलक संतप्त झाले. धनंजय मुंडे यांनी महिला विषयी अपशब्द वापरले आहेत. आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही हलणार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतल्याने पोलीस ठाण्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी पोलीस अधीक्षकांशी संपर्क करुन महिलांना न्याय मिळण्याची मागणी केली.

मोर्चात भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, महिलाध्यक्ष काशीबाई गोल्हार, पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर, धनंजय बडे, भीमराव फुंदे, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, गोकुळ दौंड, अभय आव्हाड, रणजित बेळगे, नगरसेवक प्रवीण राजगुरू, आरपीआयचे तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, नगरसेवक रमेश गोरे, प्रवीण राजगुरू, रामनाथ बंग, दीपाली बंग, सुरेखा गोरे, ज्योती मंत्री, मंगल कोकाटे, सुलभा बोरुडे, सुनीता बुचकुल, मनीषा घुले, पुरुषोत्तम आव्हाड, सुनील परदेशी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)