Dhananjay Munde Nomination | मंत्री धनंजय मुंडे यांना अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने परळी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. विशेष म्हणजे यावेळी मुंडे यांचा सामना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्याशी होणार आहे.
दोन गटांमध्ये विभागलेल्या राष्ट्रवादीमुळे परळीची लढत अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. अशातच मुंडे यांच्या निवडणूक शपथपत्रातील तपशिलाची चर्चा होऊ लागली आहे.
काय आहे धनंजय मुंडेंच्या शपथपत्रातील ‘नवा’ तपशील? | Dhananjay Munde Nomination
धनंजय मुंडे यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात पाच अपत्यांचा उल्लेख केला आहे, ज्यात दोन नवीन नावे शिवानी मुंडे आणि सीशिव मुंडे यांची भर पडली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात या दोन्ही मुलांचा उल्लेख नव्हता, कारण त्यावेळी हे अपत्य त्यांच्यावर अवलंबून नव्हते, असे सांगण्यात आले आहे.
शपथपत्रात व्यक्तीवर अवलंबून असलेल्या अपत्यांचेच उल्लेख असतात, त्यामुळे या निवडणुकीच्या शपथपत्रात आता शिवानी आणि सीशिव यांचा समावेश केला आहे.
२०१९ च्या निवडणुकीत तीन अपत्यांचा उल्लेख | Dhananjay Munde Nomination
२०१९ मध्ये दिलेल्या शपथपत्रात धनंजय मुंडेंनी वैष्णवी, जानवी आणि आदीश्री या तीन मुलींचाच उल्लेख केला होता. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीच्या शपथपत्रातील पाच अपत्यांचा उल्लेख चर्चेचा विषय ठरत आहे.
यावेळी मुंडेंनी, शिवानी, सीशिव, वैष्णवी, जानवी आणि आदीश्री या पाच अपत्यांची नावे नमूद केली आहेत,
धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख – परळीत महत्त्वाची लढत | Dhananjay Munde Nomination
गेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता, परंतु त्यावेळी ते एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत होते. आता शरद पवारांनी धनंजय मुंडेंविरोधात राजेसाहेब देशमुख यांना परळीतून उमेदवारी दिली आहे. देशमुख यांना उमेदवारी देत शरद पवारांनी मराठा कार्ड वापरल्याची चर्चा होत आहे.
परळीत काही स्थानिक नेत्यांनी देखील अपेक्षा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मुंडे, देशमुख आणि अपक्ष उमेदवार यांच्यामधील ही लढत रंगतदार होणार आहे.