मुंबई : काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या आरोपांमुळे वादात सापडलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला होता.. बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली होती. आता मात्र मुंडे ज्यांच्यासोबत अनेक वर्षांपासून संबंधात आहेत, त्या करुणा शर्मा यांनीच मुंडेंविरुद्ध मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी आपल्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप करुणा यांनी केला आहे. यात १४ वर्षांच्या मुलीचाही समावेश असून, ती सुरक्षित नसल्याचेही तक्रारीत नमूद केले आहेत. शिवाय, पोलिसांनी सहकार्य न केल्यास २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
करुणा यांनी पोलीस आयुक्ताकड़े दिलेल्या अर्जामध्ये म्हटले की, माझे पती धनंजय मुंडे यांनी तीन महिन्यापासून दोन मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात लपून ठेवले आहेत. मला त्यांना भेटू देत नाही. २४ जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बँगल्यावर जाताच, मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांना बोलावून मला हकलून लावले. बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाही. त्यात १४ वर्षाच्या मुलीचाही समावेश असून तिथे महिला केअरटेकरही नाही. मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करतात. माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असतली, अस करुणा यांनी तक्रारीत म्हटले आहे.
आज मेरा जन्मदिन हे पर मेरे पती ने 3 महीने से मेरे बच्चे छुपा के उसके बंगले चित्रकूटपे रखे हे मुझे मिलने ओर बात करने भी नहि दे रहा हे राजनीति की पावर का दूर उपयोग
Posted by Karuna Dhananjay Munde on Monday, 1 February 2021
तसेच माझ्या मुलांची आणि माझी भेट घालून दिली नाही तर २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आजाद मैदान येथे उपोषणासाठी परवानगी दया आणि मुंडे यांच्यावर कठोर करावाई करा अशी विनंतीही त्यांनी केली आहे.