बलात्काराच्या आरोपानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे बीडमध्ये; जेसीबीवरुन फुलांची उधळण

मुंबई – मागील काही दिवसांपासून गंभीर आरोपांच्या फेऱ्यात अडकलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तक्रार मागे घेतल्यानंतर मोठा दिलासा मिळाला. यानंतर ते पहिल्यांदाच बीडमध्ये पोहचले. यावेळी सर्मथकांकडून धनंजय मुंडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या समर्थकांकडून जेसीबीमधून धनंजय मुंडे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली.

जंगी स्वागत पाहून धनंजय मुंडे भारावून गेले. ते म्हणाले कि, जिथे जाईल तिथे लोकांचे प्रेम, गावोगाव स्वागत-सत्कार अनुभवून मी भारावून गेलो. तुम्हा सर्वांचे हे प्रेम आणि आशीर्वाद मला कोणत्याही संकटाशी तोंड द्यायची प्रेरणा देतात, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लोणी (वारणी) ता.शिरूर येथे संत खंडोजीबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या प्रसंगी उपस्थित राहिलो.२००२साली पहिल्यांदा इथे आलो तेव्हा बाबांनी माझ्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला होता. आज तीच माया या भागातील लोक माझ्यावर करत आहेत; सदैव ऋणात राहीन, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.

दरम्यान, शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोह येथील लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्राम सचिवालयाचे आज लोकार्पण करण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.