Pankaja Munde-Dhananjay Munde । राज्यात आज विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर भगवान गडावर भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. त्यातच कृषिमंत्री धनंजय मुंडे हे तब्बल 12 वर्षांनंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यात एकत्र आले आहेत.
राज्यात दसरा मेळाव्याची मोठी परंपरा आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या भगवान गडावरील मेळाव्याकडे राज्यभराचे लक्ष वेधले जात होते. त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा पार पडला.
धनंजय मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर मुंडे घराण्यात फुट पडली होती. मात्र, राज्यातील बदलत्या समिकरणात भाजपा आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी सत्तेत सोबत आली आहे. लोकसभेसाठी निवडणुकीच्या दरम्यान पंकजा मुंडे आणि त्यांचे भाऊ धनंजय मुंडे हे अनेक वर्षांनी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
भगवान भक्ती गडावर आज पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत आहे. या दसरा मेळाव्यात मंत्री धनंजय मुंडे यांनी धडाकेबाज भाषण केलं. या भाषणत धनंजय मुंडे यांनी विविध मुद्द्यांना स्पर्ष केलं. तसेच मनोज जरांगे यांना देखील त्यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे.
‘आपला मेळावा विचाराचा मेळावा आहे. भगवान गडाच्या भूमिपूजनाला त्यावेळी १९६०ला तात्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. त्यावेळी संत भगवान बाबाच्या मनात प्रश्न आला. गडाला नाव काय देऊ.
तेव्हा चव्हाण म्हणाले, तुमच्या नावातच भगवान आहे. त्यामुळे गडाला भगवान नाव द्या. आमच्या नशिबात संघर्ष आहे. तुमच्या सर्वांच्या नशिबातही संघर्ष आहे. अशा संघर्षाच्या काळात आपण एकत्र आहोत ही अभूतपूर्व गर्दी सांगत आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
तुम्हा सर्वांना सांगतो, या पवित्र दसरा मेळाव्याच्या दिवशी शेरोशायरी करायची नाही. तरीही सांगतो, तुम्ही दोन्ही हातवर करून मुठी वळवा, आपण सर्वजण या संघर्षात एक आहोत, एक आहोत, एक आहोत…, असं धनंजय मुंडे म्हणाले.
त्यांनी पुढे एक शेर म्हटला… “तुम लाख कोशिश करो, हमे हराने की, हम जबजब बिखरेंगे, दुगनी रफ्तार से निखरेंगे” असं ते देखील म्हणाले.
ही बातमी नक्की वाचा….
Dhananjay Munde : “नवीन मेळावा सुरु करून कोणीही…”; धनंजय मुंडेंचा मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल