मुंबई – राष्ट्रवादी नेते, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ‘धनंजय मुंडे’ यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास छातीत वेदना जाणवू लागल्या. आणि धनंजय मुंडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी हे खोडून काढत त्यांना भोवळ आल्याचे सांगितले.
दरम्यान, आता धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर असून, आता त्यांचा रुग्णालयातील पहिला फोटो समोर आला आहे. एका इन्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटवर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नुकतंच अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची आस्थेवाईकपणे चौकशी करत आराम करण्याचा सल्ला दिला.
View this post on Instagram
तसेच, अजित पवार यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही दूरध्वनी वरून धनंजय मुंडे यांची विचारपूस करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री महोदयांनी रुग्णाल्यामध्ये जाऊन मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.