बीड – माजी मंत्री धनंजय मुंडे हे त्यांच्या अनोख्या भाषण शैलीमुळे ओळखले जातात. सभागृहात नेत्यांशी शाब्दिक चकमक असो किंवा मीडियासोबतची बातचीत मुंडे नेहमीच हजरजबाबीपणा दाखवून देतात. महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने मुंडे सध्या विरोधी बाकावर आहेत. त्यामुळे ते आपल्या शरीराकडे पूर्णतः लक्ष देताना दिसताहेत. धनंजय मुंडे यांचा जिममधील वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय.
मुंडे यावेळी जिममध्ये चांगलीच कसरत करताना दिसताहेत. निळ्या रंगाच्या ड्रेसअपमध्ये मुंडे जोरदार डिप्स मारताहेत तर जिम ट्रेनरकडून काही टिप्स देखील घेताना दिसताहेत. विशेष म्हणजे आपल्या जिम कसरतीचा व्हिडिओला ‘बिलिव्हर’ नावाचं इंग्रजी गाणं लावून मुंडेंनी हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवरून पोस्ट केलाय. कार्यकर्त्यांसह सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
View this post on Instagram
मुंडे समर्थकांनी या व्हिडिओवर जोरदार कमेंटबाजी केली आहे. कोणी धनंजय मुंडेंना आता फिट राहण्याचा सल्ला दिलाय तर कोणी भाऊ सिक्सपॅक भी बनायेंगे और सरकार भी असं म्हटलंय. या व्हिडिओमध्ये परळी वैजनाथ हे लोकेशन देखील टाकल्याचे दिसून येते. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
राजकीय घडामोडींमध्ये नुकतंच काही ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या. ओबीसी आरक्षण प्रलंबित असताना निवडणूक जाहीर झाल्याने मुंडे यांनी याबाबत एक ट्विट देखील केलं आहे. राज्यातील 92 नगर परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असल्या, तरी माझ्या मतदार संघातील परळी नगर परिषद निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना 27% जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण परत बहाल केले जावे, ही आमची भूमिका असल्याचे मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे.
राज्यातील 92 नगर परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असल्या, तरी माझ्या मतदार संघातील परळी नगर परिषद निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना 27% जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण परत बहाल केले जावे, ही आमची भूमिका आहे व राहील. #OBC
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 10, 2022