मुंबई – राष्ट्रवादी नेते, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ‘धनंजय मुंडे’ यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यांना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास छातीत वेदना जाणवू लागल्या. आणि धनंजय मुंडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळपर्यंत त्यांना आयसीयूमधून सामान्य वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते.
दरम्यान, आता धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर असून आज ब्रीच कॅंडी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताना मुंडे यांनी आता प्रकृती चांगली असून माझ्या प्रकृती साठी प्रार्थना करणारे सर्व कार्यकर्ते,
हितचिंतक तसेच रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करणारे सर्व पक्षाचे नेते मंडळी व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेऊन लवकरच मी पुन्हा पूर्वीसारखा बरा होऊन जनसेवेत दाखल होईल. असे ते म्हणाले.